कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे केंद्र
कवी कालिदास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक ही विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्य व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था आहे.
या संस्थेमध्ये एकूण ८ व्यवसाय असून एकूण १५ तुकड्या कार्यरत आहेत. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाते.
व्यवसाय
तुकड्या
विद्यार्थी
दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये जोडारी, कातारी, यांत्रिक मोटार गाडी, तारतंत्री आणि वीजतंत्री या व्यवसायांचा समावेश आहे.
एक वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये संधाता, यांत्रिक डिझेल आणि फॅशन टेक्नॉलॉजी या व्यवसायांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आणि उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.